पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुण्यात शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कारागृह महिला पोलीस भरतीच्या वेळी घडलेल्या प्रकारावर पालकांकडून मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली.531 कारागृह महिला पोलीस जागांसाठी सुमारे 3000 मुलींनी गर्दी केली प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला.या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यानंतर मुली पळत सुटल्या त्यामुळे चेंगरा चेंगरी झाली. अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या. या प्रकारमुळे पालक संतप्त झाले,आपल्या मुलीचे पोलीस होण्याचे स्वप्न धुळीला मिळणार का हा प्रश्न त्यांच्या समोर होता.
मुलींनी अनेक महिन्यांपासून या भरतीसाठी तयारी केली. मैदानी चाचणीसाठी प्रचंड वेळ आणि मेहनत खर्ची केली.ही भरती सन २०२२-२३ मधील पुणे कारागृह पोलिस भरती म्हणून रखडलेली आहे. एकूण 513 जागेसाठी ही भरती पार पडत आहे. इतर पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रेही देण्यात आली. मात्र, पुणे कारागृह पोलिस भरतीचा अजूनही ठोस निर्णय होत नव्हता. परंतु आता कुठेतरी ही भरती प्रक्रिया पार पडत असताना अशा प्रकारचा गोंधळ झाला. या पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणी मध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे.
