थेऊर:(हवेलीनामा वृत्तसेवा) सालाबादप्रमाणे थेऊर(ता.हवेली) येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.गावातील सर्व तरुणाई एकत्र येत एक गाव एक शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केला यंदाचे वर्ष चौथे होते गावातील सर्व युवावर्ग शिवभक्त शिवजयंती निमित्त एकत्र येऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती  मोठ्या उत्साहात संपन्न झाली अतिशय दिमाखदार सोहळा साजरा करण्यात.१७मार्चला संध्याकाळी  शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त पुरंधर किल्ल्यावर गेले १८मार्चला  सकाळी आठ वाजता शिवज्योत गावात आणली.गावतील ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पुजा गावातील माजी सैनिक तसेच पोलिसांच्या हस्ते करुन पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्याची आतिष बाजीने संपूर्ण थेऊरगाव शिवमय झाले होते गावात सर्वत्र भगवे झेंडे लावून गाव भगवेमय झाले होते सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीची सुरुवात ग्रामपंचायत चौकातून झाली ग्रामप्रदक्षिणा पुर्ण करुन चौकातच शिव नामाचा जयघोषाने असमंत दुमदुमला या मिरवणूकीत लहान मुले,मुली,गावातील शिवभक्त डोक्यावर भगवे फेटे बाधून मिरवणूकीत सहभागी झाले होते यावेळी ढोलताशाच्या गजात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक  सोहळा अतिशय नेत्रदिपक होता शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती संध्याकाळी आठ वाजता थेऊर ग्रामपंचायत चौकात मिरवणूक आल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांच्या हस्ते आरती करुन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बोबडे,पोलिस हवालदार विजय जाधव,विशाल बनकर,दिगंभर जगताप, महेश करे, प्रशांत सुतार,कदम, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियमांचे काटेकोर पालन करुन शिवजयंती साजरी केल्यामुळे लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी गावचे  कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *