पुणे (हवेलीनामा वृतसमूह) हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेज 1 रस्त्यावर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली. या आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवाश्यापैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर उर्वरित सर्व जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी पाठविण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील पुढे येत आहे ही आग नक्की कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही
चालकाचे सकाळच्या शिप मधील कामगाराला घेऊन जाणारी कंपनीची गाडी होती या गाडीत एकूण बारा कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेमध्ये गाडीचा चालक हा देखील गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत असून सविस्तर माहिती थोड्या वेळात उपलब्ध होण्याची शक्यता आहे
मागच्या सीटवर बसलेल्या चार कामगारांना बाहेर पडण्याचा दरवाजा न उघडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे
