थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर लोणीकंद रस्त्यावर थेऊर मशानभूमीच्या वळणावर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर पलटी झाला यात कुठल्याही जीवित हानी झाली नाही परंतु हा कंटेनर स्मशानभूमीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या डीपी वरती पलटी झाला त्यामुळे मोठा अनर्थ कळला लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार महेश करे व बिटमारशील यांनी माहिती मिळताच तात्काळ रस्त्याच्या कडेला धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेन मागून हा ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात पोलिसांना यश आले असून वाहतूक थोड्याच वेळात सुरळीत होत आहे यामध्ये लोणी काळभोर वाहतूक विभाग मात्र यापासून दूर असल्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आला आहे. वाहतूक पोलिसांचा एकही कर्मचारी या ठिकाणी एवढा मोठे घटना घडूनही उपस्थित नव्हता त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत शहर वाहतूक विभागात थेऊर आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.विक्रम दराडे, होमगार्ड लटके,व पोलिस मित्र याठिकाणी सहकार्य करताना दिसून आले.

आज पर्यंत या मार्गांवर अनेक अपघात घडले वाहतूक अडचणी निर्माण झाल्या. परंतु येथील वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे येथील समस्ये संदर्भामध्ये वाहतूक विभागाचे डीसीपी अमोल झेंडे यांच्याशीही या समस्या संदर्भात चर्चा केली होती परंतु आज तागायत यावर कसलीच उपायोजना झाल्याचे दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे तीर्थक्षेत्र थेऊर हे वाहतूक विभागाच्या अखत्यारित येत नाही का असा सवाल नागरिक विचारताना दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *