पुणे (हवेलीनामा वृतसमूह) ब्रेन हॅमरेज झालेल्या वडिलांचे वैद्यकीय प्रमाणपत्र कुलमुखत्यार करण्यासाठी आवश्यक असल्याने ते देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने 5000 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मिळाल्यानंतर यावर कारवाई करत त्या डॉक्टरला पाच हजाराची लाथ स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उन्मेश गुट्टे यांनी तक्रारदार यांच्या वडिलांसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडे 5000 रुपयांची लाच मागितली तक्रारदाराचे वडील हे ब्रेन हॅमरेज असल्याने ते हालचाल करू शकत नाहीत तक्रारदार यांना रजिस्टर कार्यालयामध्ये कुलमुखत्यार करण्यासाठी त्यांच्या वडिलांचे वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता होते म्हणून त्यांनी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे याची मागणी केली त्यावर त्यांनी यासाठी 5000 रुपयाची लाज मागितली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याची खातर जमा केल्यानंतर त्यांनी पंचा समक्ष हे 5000 रुपये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप सरदेशपांडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
