लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा) सराईत गुन्हेगार भरत तुकाराम जैद टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यात जैद सह सात गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील थेऊर येथील अक्षय चव्हाण व त्याची पत्नी शितल चव्हाण यांच्यावर जैद टोळीने लघुशंका करताना हटकले म्हणून दगडफेक करून गोळीबार केला या दगडफेकीत महिललेच्या डोक्यात दगड लागून गंभीर जखमी झाली होती. तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाला या घटनेत सराईत गुन्हेगार जैद टोळीवर खुनाचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भरत तुकाराम जैद (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ७ साथीदार यांचेविरुद्ध चाकण पोलिस स्टेशन, आळंदी पोलिस स्टेशन, भोसरी पोलिस स्टेशन एम आय डी सी पोलिस स्टेशन, निगडी, दिघी, पिंपरी पोलिस स्टेशन येथे खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, सार्वजनिक रस्त्यावर बेकदारपणे वाहन हाकून खुन नसलेला सदोष मनुष्य वध करणे, बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, बलात्कार, फसवणुक, दहशत पसरविणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थीक उपलब्धीचे उद्देशाने तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचे टोळीची दहशत व नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टोळी तयार करून टोळीप्रमुख भरत जैद व त्याचे इतर ७साथीदार संघटीतरित्या अनेक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्भाव होण्यासाठी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उप-आयुक्त परिमंडल५, यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त यांना प्रस्ताव सादर केला. व कागदपत्राची तपासणी करुन या जैद टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलिस हवालदार तेज भोसले, संभाजी देवीकर, प्रशांत नरसाळे, मंगेश नानापुरे, संदिप धुमाळ,महिला पोलिस योगिता भोसुरे यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरीराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत ही कारवाई करणेत आली आहे.
राजेंद्र पन्हाळे
(पोलिस निरीक्षक लोणी काळभोर पोलिस स्टेशन)
