यवत (हवेलीनामा वृत्तसेवा ) यवत पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्गम भागात जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणाऱ्या परराज्यातील चौघां जणांच्या टोळीला १२ तासांच्या आत ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ मार्च रोजी रात्री १०:३० च्या सुमारास यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सहकारनगर परिसरात निळकंठेश्वर मंदिराजवळील विश्वजीत शशीकांत चव्हाण यांच्या घरात चार चोरट्यानी प्रवेश करुन झोपलेल्या दोन पुरुष व दोन महिलांना जबर मारहाण करून व सोन्याचे दागिने चोरी केले या मारहाणीत विश्वजीत शशिकांत चव्हाण वय 33 मृत्यूमुखी पडले.घरातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून यवत पोलिस स्टेशनची दोन पथके, स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करून तपास पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, घटनास्थळाचा परिसर हा दुर्गम असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता, घटना झाल्यानंतर यातील तक्रारदार यांनी परिसरातील लोकांना मदतीस फोन केला त्यापैकी दोन व्यक्तींनी चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरटे कॅनॉलचे दिशेने रेल्वे रूळाकडे पळून गेल्याचे सांगितले. परिसरात शोध घेतला असता आरोपी पळून गेलेल्या भागात एक संशयित बॅग मिळून आली त्यामध्ये कपडे व इतर साहित्य मिळाले असून एका जर्कीगवर युनिव्हर्सिटी दिल्ली असे लिहीलेले होते. त्या आधारे आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी पुणे स्टेशन कडे गेल्याचे बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेतला असता येरवडा परिसरातील गुंजन थेटर चौकातील ट्रॅव्हल्स स्टॉपवर दोन संशयित मिळून आले, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता हालचाल करू लागल्याने त्यांना ताब्यात घेतले. सलमान दिलशाद शेख (वय २८ वर्षे रा. पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद जवळ, बडौत ता. जि. बागपथ राज्य उत्तर प्रदेश) मोमीन अकबर शेख (वय-४५ रा. पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद, जवळ बडौत ता. जि. बागपय राज्य- उत्तर प्रदेश ) रावतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर (वय २६ धंदा- रा. बडौत जि. बागपथ राज्य उत्तर प्रदेश) गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान (वय-२५ धंदा-गुराळ कामगार रा. काशीराम कॉलनी बडौद ता.जि बागपथ राज्य उत्तर प्रदेश) यांनी गुन्ह्याची कबुली दिली
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिगदार,उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गायडे,दत्ताजीराव गावडे, कुलदीप संकपाळ, प्रवीण सपांगे, सुवर्णा गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, किशोर वागज, सलीम शेख, ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, असिफ शेख, महेश बनकर, अतुल फरंदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, विजय कांचन, अभिजीत एकशिंगे, गहुल पवार, गहुल घुंबे, मंगेश थिगळं, योगेश नागरगोजे, रजित कोंडकें, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, सागर नामदास, तुषार भोईटे, पोलीस अमंलदार मंगेश भगत, निलेश शिंदे, अजय घुले अतुल देरे विभीषण सम्तुर तमेच यवत पोलीस स्टेशन कडील अमंलदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, गमदास जगताप, अक्षय यांदव, दत्ता जय काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ, विशाल जावळे, प्रमोद गायकवाड, मारुती बागते, प्रणव ननवरे यांचे पथकांनी केली आहे.पुढील तपास यवत पोलिस करत आहे.
