उरुळी कांचन (हवेलीनामा वृतसमूह) बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत किफायतशीर शेती करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. त्याला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी अद्यावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारे हे कृषी प्रदर्शन उपयुक्त आणि नवसंजीवनी देणारे आहे. कृषी क्षेत्राच्या समस्या संपत नाहीत, त्यांचे स्वरुप बदलत राहते. आज शेती आणि शेतकरी मान्सूनच्या लहरीपणामुळे अडचणीत आहे. बदलत्या हवामानात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य विद्यापीठ, विज्ञान कृषी केंद्र, कृषी विभागामार्फत दिले जाते असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.हवेलीतील उरुळी कांचन येथे मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ‘कृषी वैभव’ या भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. प्रतिष्ठानचे हे पाचवे वर्ष असुन कृषी प्रदर्शनास यावर्षी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनास प्रायोजक पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद पुणे, ग्रामपंचायत उरुळी कांचन यांचे लाभले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश थोरात उपस्थित होते. याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक सुरेश घुले, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, सरपंच अमित कांचन, यशवंतचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक सुशांत दरेकर, संचालक अमोल हरपले, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन, संतोष कांचन, संजय टिळेकर, सागर कांचन, सोमनाथ कोतवाल, सुनिल गोते, रोहिदास कोतवाल, संजय कांचन, सुभाष कड, विकास कोतवाल, सुनिल जवळकर, संतोष दौंडकर, हरिदास गोते, नवनाथ मोहिते, गोविंद तापकीर, पोपट साठे, आनंदा काळे, सरपंच गणेश टिळेकर, गुलाब चौधरी, सीमा कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, शेतकरी वर्ग, महिला वर्ग, प्रशासकीय अधिकारी वर्ग, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कृषी प्रदर्शनास शिरुर – हवेली चे माजी आमदार अशोक पवार, जेष्ठ नेते प्रा के डी कांचन, यांनी सदिच्छा भेट दिली.
