उरुळी कांचन -(हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदवणे येथील एका युवकावर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदवणे तालुका हवेली येथील निखिल एकनाथ खेडेकर वय 32 हे मोटरसायकल क्रमांक एम एच 12 एच पी 6466वरुन आपल्या मित्रा समवेत शिंदवणे गावाकडून उरुळी कांचन कडे जात असताना चिंतामणी वॉशिंग सेंटर या ठिकाणी तिनं जणांनी दुचाकी वरून पाठीमागून येऊन गाडीवर मध्ये बसलेल्या व्यक्तीने त्याच्या हातातील ऊस तोडीच्या कोयत्या तक्रारदाराच्या डोक्याच्या मागील डाव्या बाजूस मारला व शिवीगाळ केली यात तक्रारदार गंभीर जखमी झाला असून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन आरोपी फरार झालेले आहेत पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *