पुणे (हवेलीनामा वृतसमूह) घेतलेल्या जागेची सातबारावर नोंद करण्यासाठी चिंचवड येथील मंडल अधिकाऱ्याने पाच लाखाच्या लाचेची मागणी केली लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चार लाखाची रक्कम स्वीकारताना मंडलाधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसेवक चिंचवड मंडल अधिकारी सुरेंद्र साहेबराव जाधव यांनी तक्रारदार यांनी वाल्हेकर वाडी येथील सहा गुंठे जागेमध्ये बांधलेल्या बंगल्याच्या नोंदीसाठी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली यावर त्यांनी याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे गेली. लाचलोचपत विभागाने पंचासमक्ष याची पडताळणी केली असता साडेचार लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आणि यातील चार लाख रुपये मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी कार्यालयाच्या वाहन तळ येथे पंचा समक्ष स्वीकारून ही रक्कम त्यांनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या हुंदाई MH 14 JQ 8282 गाडीमध्ये डीकीत ठेवल्यानंतर त्यांना रंगीहार पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पिंपरी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.

ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप सरदेशपांडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *