पुणे (हवेलीनामा वृतसमूह) गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 2 कडून नाना पेठ येथून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ११,४०,०००/- रू. कि. चे ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमलदार असे समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीवर असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना माहिती मिळाली की,अदीब बशीर शेख, वय २९ वर्षे, रा. पेन्शनवाला मस्जित नानापेठ, पुणे. व यासीर हशीर सय्यद वय ३० वर्षे, रा. मिठानगर कोंढवा हे अमली पदार्थ विकत आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून एकुण १३,४२,०००/-रु.कि.चा मुद्देमाल यात ११,४०,०००/-रू. किं. चे ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर साहित्य जप्त करून त्यांच्या विरुध्द समर्थ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, संदिप जाधव, उदय राक्षे, योगेश मांढरे, युवराज कांबळे, तसेच समर्थ पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार इम्रान शेख, कल्याण बोराटे यांनी केली.
