लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा) महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे अधिकृत उमेदवार अशोक बापू पवार यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची लोणी काळभोर येथे सभा झाली यावेळी बोलताना त्यांनी महायुतीवर चौफे टीका करत महायुतीच्या ध्येयधोरणांचा समाचार घेतला.
या सभेला नागरिकांची मोठी गर्दी होती यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून जे घडतंय यांचा पाढाच खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडला.राज्यातील वाढती महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना याकडे लक्ष वेधले राज्यासमोर हे मुद्दे असताना हे मुद्दे सोडवण्यात महायुती सरकार सपशेल अपयशी ठरले असून याला भारतीय जनता पार्टीच जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.
यावेळी त्यांनी एका दैनिकाचा हवाला देत सांगितले की यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आजपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी राहिलेली आहे नोकऱ्या कधी आलेले आहेत हा सगळा जर चार्ट बघितला तर सगळ्यात विकासाचा उच्चांक कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाला त्या माणसाचं नाव शरद पवार आहे.
यावेळी त्यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे बुडलेल्या पैसे वसूल करण्यासाठी संसदेत आवाज उठवणार असून ठेवीदारांच्या हक्कासाठी अर्थमंत्र्यांना भेटून प्रश्नाची सोडवणूक करणार असल्याचे सांगितले. सरकार आल्यावर अशोक पवारांना राज्यात मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात सगळ्यात मोठी पोलिस भरती करणार तसेच राज्यातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना राबवून महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे सांगितले मी विकासला मत मागायला आलेली आहे. गेल्या दीड दोन वर्षाच्या काळात या राज्यामध्ये अनेक दुर्दैवी घटना घडल्या पक्ष फोडला अशा कठिण संघर्षाच्या काळात पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ज्यांच्यावर खोटेनाटे आरोप झालं कुटुंबांला त्रास दिला तरीही न डागमगता आपल्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या आमदार अशोक पवार यांनी पवार साहेबांबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही पवार साहेबांच्या निष्ठावांत शिलेदाराला भरघोस मतांनी निवडून द्या असे आव्हान मतदारांना सुप्रिया सुळेंनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *