पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) शिरूर हवेली मतदारसंघात प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले असून अटीतटीच्या लढाईत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या विजयासाठी महायुतीने कंबर कसली असून कटके यांना मिळणारा महिला भगिनी, तरुणाई व ज्येष्ठांचा प्रतिसाद पाहता भाजपचे खंबीर पाठबळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची व शिवसेना शिंदे गटाची ताकद यामुळे माऊली कटके यांच्या प्रचारात मोठी सरशी आणि लोकप्रियता दिसून येत असून उज्जैन महाकाल यात्रेतील माता भगिनी तरुणाई यांच्यासह महायुतीच्या लाडकी बहिण योजनेचा मोठा फायदा माऊली कटके यांना मताधिक्य मिळवून देत विजयात मोठा वाटा उचलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मतदार संघात महिला भगिनींचे पन्नास टक्के मतदान असून यातील अनेक महिला भगिनींना लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला असून ही योजना सुरू राहण्यासाठी महायुती सरकार आले पाहिजे आणि यासाठी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना विजयी करायला हवे हे महिला भगिनींनी समजून घेतले असून इतरांनी कितीही काही म्हणू द्या आम्ही महायुतीला पर्यायी माऊली कटके यांना मतदान करणार असल्याची चर्चा असून लाडकी बहीण माऊली कटके यांच्या मताधिक्य वाढविण्यासाठी मोठी फायदेशीर ठरणारच असून विजयात मोलाचं योगदान देणारी ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारकडून दरमहा १५०० रुपये देण्याची ही योजना आहे. १७ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तीवर ती सुरु करण्यात आली. नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्स देत सरकारने आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते दिले आहेत. शिवाय प्रत्येक पात्र बहिणीला या योजनेचा लाभ घेता यावा, म्हणून आत्तापर्यंत दोनदा या योजनेला मुदतवाढही देण्यात आली होती.यामुळे निवडणुकीत लाडक्या बहिणी सरकारच्या मागे उभ्या राहणार असल्याचे जाणकार सांगत आहे.

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, यांनी या योनजेचा पाया घातला. बंद होणार म्हणून विरोधक टिका करत असले तरी, ही योजना रक्षाबंधनापासून थेट भाऊबीजेपर्यंत पोहोचली आहे. ती भविष्यातही सुरु राहिल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. शिवाय या योजनेचे मानधन हे दीड हजारांवरून दोन हजार, अडीच हजार, तीन हजार करण्याचा मानसही महायुती सरकारने व्यक्त केला आहे.

ही योजना १२ वर्षांपूर्वी दिवंगत श्री मनोहर पर्रीकर (गोव्याचे माजी मुख्यमंत्री) यांनी सुरू केली होती आणि पुढे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आता महाराष्ट्रात लागू करण्यात आली. लाडकी बहिण योजनेचे आत्तापर्यंत पाच हप्ते म्हणजेच ७५०० रुपये देण्यात आले आहेत. या पैशातून अनेक बहि‍णींनी संसाराला हातभार लावला तर काहींनी आपली स्वप्ने पूर्ण केली. काही लाडक्या बहिणींनी या साडेसात हजार रुपयांतून छोटा-मोठा व्यवसाय सुरु केल्याच्या यशोगाथाही समोर येऊ लागल्या आहेत.

लाडकी बहिन योजनेचा सहावा हप्ता लवकरच म्हणजे डिसेंबरमध्ये मिळणार आहे. या योजनेच्या निधीची अर्थसंकल्पातच तरतूद केलेली असल्याने, ही योजना बंद पडणार हा फक्त विरोधकांचा बनाव असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. ही योजना सुरु झाल्यानंतर, लाभार्थी महिलांनी पुन्हा महायुती सरकारलाच सत्तेत आणण्याचे बोलून दाखवले. या योजनेमुळे महायुती सरकारचे पारडे जड समजले जात आहे.ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे, असा आरोप विरोधकांनी केला. मात्र या योजनेसाठी गेल्या अर्थसंकल्पात ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याने, ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय या योनजेचा राज्याच्या आर्थिक स्तरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे.

ग्रामीण भागात शेतमजूर व कामगार म्हणून राबणाऱ्या महिला २०० ते ३०० रुपयांत दिवसभर काम करतात काही ठिकाणी याहून कमी रोजगार असून सरकारने दिलेल्या१५०० रुपयांच्या व एकूण साडेसात हजारांच्या हप्त्याने अनेक बहिणींना मोठा हातभार लागला असून गोरगरीब बहिणींची दिवाळी गोड झाली , लेकराबाळांना कपडालत्ता घेत आला,काहींना उद्योग सुरू करता आला असून या पुण्याई व बहिणींच्या खंबीर साथीवर निश्चितच महायुती सरकार तरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत असून २३ तारखेलाच याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *