पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) हडपसर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी त्यांच्या घरातील सर्व कुटुंब प्रचारात उतरले असून आज त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांनी मांजरी, महादेवनगर हा परिसर पिंजून काढला यादरम्यान त्यांनी घरोघरी जाऊन या परिसरातील महिलांशी संपर्क साधून आपल्या मुलास मतदान करण्यासाठी विनंती केली.
प्रचाराला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असल्याने उमेदवार प्रत्येक वाढ वस्त्या गल्ल्या पिंजून काढताना दिसत असून हडपसर मतदार संघामध्ये चुरशीची लढत अनुभवास येत आहे यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी या या भागातील नागरिकांशी संवाद ही साधला आहे आज त्यांचे कुटुंबीय पूर्व भागात असलेल्या महादेव नगर तसेच मांजरीच्या सर्व वाड्यावस्त्यांवर फिरुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
