हडपसर- ( हवेलीनामा वृत्तसेवा ) हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत दादा जगताप यांच्या रॅलीसाठी राज्यसभेचे खासदार इमरान प्रतापगडी, माजी खासदार महंम्मद फैजल यांची बाईक रॅली सय्यद नगर ससाणे नगर या भागामध्ये सुरु झाली असून कोंढव्या कडे जाणार असून तिथे सभा होणार असून रॅलीला तुफान गर्दी झाली आहे रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची जगताप यांच्या स्वागतासाठी व पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे जागोजागी नागरिकांनी जगताप यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी केली आहे नागरिक प्रशांत जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उभे राहिल्याचे दिसून येत असून यंदा हडपसर मतदार संघामध्ये बदल होऊन तुतारी वाजणार असा नागरिकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे तसेच हडपसरच्या उज्वल भवितव्यासाठी जगताप यांनाच निवडून दिलं पाहिजेल असं नागरिकांचं म्हणणं आहे या रॅलीमध्ये युवकांचा मोठा सहभागी झालेले असून युवक मोठ्या संख्येने प्रशांत दादांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत तसेच समाजाच्या विविध घटकात काम करणारी सामाजिक मंडळे संघटना यांनी सुद्धा प्रशांत जगताप यांना पाठिंब्याच पत्र देऊन आम्ही या मतदारसंघात बदल घडवून तुतारीच वाजवणार असल्याचे सांगितलेले आहे.
