पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) (पुजारी सर) शिरूर हवेली मतदारसंघात यावेळी परिवर्तनाची लाट दिसून येत असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके यांना हवेलीसह शिरूर तालुक्यातील मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे गावोगावी आबांचे जंगी स्वागत होत असून यात महिला व तरुण वर्गात प्रचंड उत्साह पहावयास मिळत आहे.
मंगळवारी श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीचा आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर माऊली कटके यांनी गावभेटीवर जोर दिला शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदार त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड संख्येत जमत असल्याचे दिसून येत आहे.आरणगाव पागा,उरळगाव,नागरगाव, रांजणगाव आपटी,रांजणगाव सांडस, तळेगाव ढमढेरे आदी गावांमधून युवक महिलांमध्ये उत्साह पहावयास मिळत आहे.
निवडणूक प्रचाराच्या कालावधीत शिरूर तालुक्यातील. मतदार माऊलींच्या बाजुने आहेतच परंतू भाजपचे जिल्ह्यातील नेते प्रदीप कंद यांनीही आपला सहकारी माऊली कटके यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून सोबत करत आहेत.
हवेली तालुक्यातील गावामधून एकजूट पहावयास मिळत असून लोणी-काळभोर लोणी स्टेशन, थेऊर, कोलवडी,केसनंद,नायगाव, सोरतापवाडी, वाघोलीसह अन्य गावात माऊली कटके यांच्या प्रचारासाठी तरुण एकवटले आहेत. आपल्यातील स्थानिक गटतट बाजुला ठेवुन प्रचारात सामील झाल्याचे चित्र आहे.
