कोलवडी- (हवेलीनामा वृत्तसेवा)  हवेली तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची मासिक बैठक पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष हभप ज्ञानोबा उर्फ माऊली कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मीटिंगमध्ये परिषदेच्या आगामी वाटचाली विषयी तसेच विशेष  मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने वारकरी साहित्य परिषदेच्या होणाऱ्या मेळाव्याचे नियोजन व वारकरी वर्धापन दिन कार्यक्रम  कुंजीर लॉन्स कुंजीरवाडी येथे ता.(11 नोव्हेंबर) रोजी वारकरी मेळाव्याचे नियोजन करण्याचा निर्णय  जिल्हा वारकरी पदाधिकारी व हवेली तालुक्यातील वारकरी साहित्य परिषदेतील पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मेळावा आणि वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय
घेण्यात आला. यावेळी हवेली तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल गावडे, उपाध्यक्ष हभप विलास उंद्रे, सचिव हभप पांडुरंग उंद्रे, हभप बाळासाहेब हरपळे, कार्याध्यक्ष, खजिनदार हभप शंकर वाबळे,महिला अध्यक्ष हभप  वंदना काकडे, संगीत उंदरे, महिला उपाध्यक्षा नीता कोतवाल,अनिल घुले, संजय कोतवाल, उत्तम साठे, अमोल भोरडे, नरसिंह सुरवसे,संजय शितकल, प्रा. सुरेश वाळेकर, शांताराम कंद, अनंता थोरात, शशिकला बाळासाहेब भोसले  बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *