शिरूर (हवेलीनामा ऑनलाईन) आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने येथील शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात ६७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख,तहसीलदार लैला शेख, मुख्याधिकारी अॅड.प्रसाद बोरकर, वैद्यकीय अधीक्षक अर्चना शेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.सुभाष पवार,पाणी पुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद,संदिप कडेकर,राष्ट्रवादी लीगल सेलचे शहराध्यक्ष अॅड.रविंद्र खांडरे,प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज सय्यद यांसह नागरिक उपस्थित होते.
रक्तदान शिबीरास पुणे येथील रास्तापेठेतील पीसीआय रक्तपेढीचे सहकार्य लाभले असल्याची माहिती तहसीलदार लैला शेख यांनी दिली.
