राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन) श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना विविध बक्षीस वाटपांसह लाखो रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. या अनोख्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाची चर्चा तालुक्यात रंगली आहे. रोहीदास तुपे युवा मंच आणि शेखर तुपे मित्र परिवारातर्फे आयोजित या स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नव्या पिढीला आपल्या भारतीय पारंपारिक सणांचे महत्त्व समजावे, तसेच यातून ज्ञानार्जन व्हावे या उद्देशाने शेखर तुपे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा घेण्यात आल्या. गावातील बहुतांशी सर्व कुटुंबियांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संध्या भांगरे, माधुरी शिंदे, द्वितीय क्रमांक मुक्ता जाधव, तृतीय क्रमांक पूजा मेमाणे , पूनम जाधव, छाया शिवले, रेखा पवार, दिपाली शिवले, भाग्यश्री पांडे यांनी मिळविले.
प्रथम क्रमांक विजेत्यांना पंधरा लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांक विजेत्यांना दहा लाख रुपयांचे तर तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण आयोजकांकडून देण्यात आले. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यांसह गृहोपयोगी भेटवस्तू महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आली.
बक्षीस वितरण सरपंच मयुरी महाळुंगकर ग्रामपंचायत सदस्य मंगल भोसले अर्चना महाळुंगकर, वैशाली महाळुंगकर, साधना तुपे, निर्मला तुपे, ज्योती तुपे, प्रेरणा तुपे, स्वाती तुपे, विद्या भालेराव, कोमल तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शेखर तुपे यांनी केले होते.
