थेऊर(हवेलीनामा वृत्तसेवा) यावर्षीच्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे पार पडल्या यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
यात थेऊर येथील पैलवान आयुष दत्तात्रय काळे (वय14) याने 14 वर्षाखालील विभागीय कुस्ती स्पर्धेत 62 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे तो दि बिशप स्कूल कॅम्प पुणे येथे शालेय शिक्षण घेत आहे.त्याला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळले असून आयुषचे आजोबा यशवंत साखर कारखान्याचे माजी संचालक पैलवान पांडुरंग आप्पा काळे  वडील मुंबई महापौर केसरी दत्तात्रय काळे यांनी आयुषला कुस्तीचे धडे देत आहेत त्याच्या या यशाचे शाळेने कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *