वाघोली-(हवेलीनामा वृत्तसेवा)वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अर्कलाईन लॉजिस्टीक्स अॅण्ड वेअर हौसिंग प्रा.लि. गोडाऊन मधुन लिनव्हो कंपनीचे २८० लॅपटॉपची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या चोरीचा शोध घेण्यात वाघोली पोलिसांना यश आले असून यात २४४ लिनिव्हो कंपनीचे लॅपटॉप व दोन पिकअप व्हॅन तीन मोबाईल असा १,०१,२५,१५०रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या जबरी चोरीत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या अनुषंगाने वाघोली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित रेजितवावाड यांनी घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथके तयार करुन तपासाची चक्रे फिरवली.गुन्हयाचा तपास चालू असताना पोलिस नाईक अजित फरांदे यानी केलेल्या तांत्रिक विश्लेषण आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंडीत रेजितवाड यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एम आय डी सी पथक पाठवून सापळा रचून यातील  तीन संशयीत आरोपी १) सुरेश महादेव कुमार, (वय ३५ वर्षे, धंदा हेल्पर रा. सध्या रा. उबाळेनगर वाघोली पुणे. मुळ रा. ग्राम सहजपुर, कल्याण ऊर्फ निवाधा, तहसिल सुराव, थाना होलगड, राज्य उत्तरप्रदेश) २) शिवाजी जगन्नाथ वसु, (वय २७ वर्षे, रा. गट नं. ४६, धानेगाव ता. गंगापुर जि. संभाजीनगर,) ३) कुमुद  रंजन झा (वय ३२ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. प्रियंकानगर वाघोली पुणे.) यांना  ताब्यात घेवुन त्यांचेकडे  विचारपुस केली  तांत्रिक विश्लेषणाची साखळी जोडुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन एकुण ९ लोकांकडुन लिनेव्हो कपंनीचे २४४ लॅपटॉप, २ पिकअप व्हॅन व ३ मोबाईल असा एकुण १,०१,२५,१५०/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी   पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव,  सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंडीत रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके, लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक अजित फरांदे, स्वप्निल जाधव, पोलिस शिपाई अमोल ढोणे, वाघोली पोलिस स्टेशनचे  हवालदार संदीप तिकोणे, पोलिस शिपाई विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडु, गणेश आव्हाळे, दिपक कोकरे, प्रितम वाघ, गहीनिनाथ बोयणे यांनी केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *