पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने धडाकेबाज कारवाई करत तीन गुन्हेगारांना गजाआड केले व त्यांच्याकडून २२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस नाईक कारखेले व मुंढे यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की, लोणीकंद फुलगाव रस्त्यावर वाढू खुर्द फाट्यावर गुन्हेगारी क्षेत्रातील सराईत गुन्हेगार सचिन माने हा आपल्या साथीदारांसह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची व पादचारी याची लूटमार करत आहे याची कल्पना पोलिस निरीक्षक गणेश माने यांना दिली त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक घटनास्थळी पोहोचले तेथे सापळा रचून १) सचिन उर्फ राहुल राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी रा.तरवडे वस्ती महम्मदवाडी हडपसर,२)सारंग उर्फ सागर संजय टोळ,३)सानी महेशकुमार तानेजा सर्व मूळ गाव पंढरपूर जी सोलापूर इतर दोन अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे एक स्विफ्ट डिझायर,कोयता, चाकू, मिरची पूड,स्क्रू ड्रायव्हर,नायलॉन दोरी असा रु ३ लाख ९८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.त्यांचेवर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला त्यात मिळालेल्या पोलिस कोठडीत त्यांनी लोणी काळभोर, वानवडी,कोंढवा,सिंहगड, येरवडा,चिपळूण व लोणीकंद (२) असा आठ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून २० तोळे सोन्याचे दागिने,१४ किलो चांदीचे दागिने व रोख रु १८ लाख,१० हजार रक्कम हस्तगत करण्यात आली असा एकूण रु २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील ,पोलीस अंमलदार मच्छिद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन शिंदे, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकाटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लोहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, सचीन पवार, शेखर काटे, नितीन घाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.
