पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) लोणी काळभोर येथील शिवाजी महाराज उद्यानात पाण्याच्या टाकी शेजारी एका तरुणाची अज्ञात कारणासाठी हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे सकाळी ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा चालू करण्यासाठी गेले असता तेथे हा तरुण निपचित पडलेला आढळला.

          लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी नेहमी प्रमाणे पाणीपुरवठा चालू करण्यासाठी शिवाजी महाराज उद्यानातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ आले तर तेथे एक तरुण जखमी अवस्थेत पालथा दिसला याची कल्पना सरपंच यांना दिली त्यावर ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली.
          याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व रुग्णवाहिकेस कळविण्यात आले दरम्यान गावातील रोहिदास मोरे यांच्या लहान भाऊ विजय उर्फ गुलशन मोरे हा रात्रीपासून घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेत होते त्यास ही माहिती मिळाल्यावर त्याने तो आपला भाऊ असल्याचे सांगितले त्यास ताबडतोब ससून रुग्णालयात हलविण्यात आले परंतु तो मृत असल्याचे सांगितले त्याची उत्तरीय तपासणी केल्यावर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपायुक्त कल्याणराव विधाते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे,पोलीस उपनिरीक्षक एच व्ही तरटे,जे डी हंचाटे यांनी भेट दिली पुढील तपास अमित गोरे करीत आहेत.
        मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर व लोणी स्टेशन परिसरात विशेषतः पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्याचा परिसर व्यसनी व तळीरामाचा अड्डा बनले आहेत येथे गांजाडी,व मद्यपीचा मोठया प्रमाणावर वावर आहे यावर संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *