कुंजीरवाडी -(हवेलीनामा वृत्तसेवा) कुंजीरवाडी (ता.हवेली) गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुंजीरवाडी या संस्थेचे दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आशीर्वाद  हॉल थेऊर फाटा येथे पार पडली असून संस्थेने १०टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा सयाजी काकडे यांनी दिली.यावेळी संस्थेच्या वाटचाली विषयी उपस्थित सभासदांना पतसंस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना महिला बचत गटांना केले जाणारे सहकार्य लघु उद्योगांना केले जाणारे कर्ज वाटप येणाऱ्या काळातील पतसंस्थेच्या याविषयी संस्थेच्या सभासदांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव दत्तात्रय नवले यांनी संस्थेचा ताळेबंद व आर्थिक लेखाजोखा सर्व सभासदांसमोर मांडला. संस्थेचे व्हाईस चेअरमन महादेव गावडे यांनी संस्थेचे नफा पत्रक नफा वाटणी व भविष्यातील संस्थे समोर असणारी उद्दिष्टे याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश प्राप्त केलेल्या शालेय विद्यार्थी तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नुकतीच पीएसआय पदी निवड झालेल्या गायत्री साहेबराव चंद यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर थेऊर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. रमाई आंबेडकर निवासी आश्रम शाळेच्या प्रमुख शेख मॅडम यांना  त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले याप्रसंगी थेऊरचे माजी सरपंच महादेव काकडे,हवेली तालुका ऍग्रो असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी काकडे, चेअरमन चंद्रभागा काकडे, संस्थेचे  संस्थापक योगेश काकडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष संदीप गोते, यशवंतचे संचालक नवनाथ काकडे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त दत्तात्रय कुंजीर, थेऊरचे माजी उपसरपंच भरत  कुंजीर, राजाराम काकडे, थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे, संजय काकडे, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश घुले, विठ्ठल कुंजीर, राष्ट्रवादी किसन सेलचे पांडुरंग काकडे, संस्थेचे व्हाईस चेअरमन महादेव गावडे, संचालक शिवाजी कुंजीर, दत्तात्रय नवले, जयराम गावडे, नामदेव तांबे, संतोष ओव्हळ,शरद कापसे, गणेश कदम,उषा कुंजीर,हर्षदा कुंजीर,मोहिनी फडतरे, उघोगपती प्रशांत मदने,उमेश फडतरे, लक्ष्मण चव्हाण,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *