पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) उरुळीकांचन येथील गोळीबारानंतर यातील मुख्य आरोपीच्या घरातून मोठा शस्त्र साठा पोलिसांच्या हाती लागला असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हयातील जखमी काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते दोघे रा. भिवरी ता. हवेली जि. पुणे यांचे यांतील आरोपी यांचे बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता.हवेली जि.पुणे यांचेशी आर्थिक व्यवहार होते. या व्यवहारामध्ये तक्रारदार यांचे शितोळे याचेकडे चाळीस लाख रु दीड वर्षापुर्वी दिले होते ही रक्कम परत देतो असे सांगुन तक्रारदार व त्यांचे साथीदार काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे म्हणून त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्यांचे रागातून शितोळेंनी त्यांचेकडे परवाना असलेले पिस्टल मधुन जिवेठार मारण्याच्या उद्देशाने चार राउड फायरिंग करुन काळूराम गोते यांना हाताला व पायाला राउड लागुन गंभीर जखमी करण्यात आले आहे. याची तक्रार उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे नोंदविली आहे.
उरुळी कांचन सारख्या मध्यवती गजबलेल्या गावाजवळ फायरींग झाल्याने ताबडतोब पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या त्यानुसार घटनास्थळाची पाहणी करुन स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळून गेल्याचे मार्गाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसलेला होता, सदर ठिकाणाहुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने १) बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे वय ४६ वर्षे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे याला ताब्यात घेण्यात येवुन अधिक तपास केला असता सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे यांने त्याचे कुटुंबातील इतर सदस्य १) निलीमा दशरथ शितोळे वय ४२ वर्षे २) जिग्नेश दशरथ शितोळे १९ वर्षे ३) आशा सुरेश भोसले वय ५२ वर्षे ४) निखील अशोक भोसले वय २५ वर्षे सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे योंचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे सर्व आरोपींना न्यायालयाने दिनांक १८/०९/२०२४ रोजी पर्यत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
जखमी काळूराम गोते याचेवर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु असुन त्यांचेवर ०३ काडतुस फायर करण्यात आले आहेत, गुन्हयाच्या अनुषंगाने एक बंदुक व एकशे पंच्याहत्तर जिवंत काडतुस, पिस्टलचे जिवंत चाळीस काडतुस, चीन दोन बॅरल, ०३ खाली मॅग्झीन असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. बापुराव दडस, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील स्थानिक.गुन्हे.शाखेचे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, सपांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे उरुळी कांचन चे पोलीस सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे, अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ, यांनी केली असून पुढील तपास उरुळी पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.
