पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) वाढत्या वाहनचोरीवर प्रतिबंध घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी गुन्हे शाखेच्या पथकास यासाठी सूचना केल्या त्यानुसार या पथकाने केसनंद फाट्यावरून एका व्यक्तीला त्याब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पल्सर व एक ऍक्टिवा असे तीन वाहने हस्तगत केली.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गोरे हे आपल्या पथकासह परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ढोणे यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की,एक इसम केसनंद फाटा वाघोली येथे एका दुचाकी जवळ घुटमळत असून त्याचा चोरीचा इरादा आहे त्यावर या पथकाने त्याठिकाणी पोहोचून खातरजमा केली असता तो तेथे दिसला त्याची चौकशी करण्यासाठी जवळ जात असताना तो पळून जात होता त्यास ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता त्याचे नाव लक्ष्मीकांत संभाजी वाघमारे रा.सणसवाडी ता शिरूर असे सांगितले.त्याच्याकडे वाहनाविषयी चौकशी केली असता पेरणेफटा,सणसवाडी व रायसोनी कॉलेज येथून तीन दुचाकी चोरल्याचे मान्य केले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश तटकरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार मोहन वाळके,पोलीस नाईक अजित फरांदे, कैलास साळुंके,विनायक साळवे,पोलीस अंमलदार समीर पिलाने,बाळासाहेब तनपुरे पांडुरंग माने सागर शेडगे यांनी केली.
