पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह)

वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके याचेवर नातेपुते, सातारा शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर व वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने मारहाण, सरकारी नोकर यांना मारहाण करणे, बेकायदेशिरित्या अग्निशस्त्रे बाळगणे व अवैध वाळु चोरीचे असे एकुण ९ गुन्हे दाखल असुन तो पोलीस स्टेशन हददीत व समाजात दहशत माजवुन वर्चस्व निर्माण करण्यासारखी कृत्य करत असल्याने त्याच्याविरूद्ध वालचंदनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी विक्रम साळुखे यांनी त्याचे एम पी डी ए अंतर्गत स्थानबध्द करणेकामी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे प्रस्ताव पाठविला होता.

या प्रस्तावावर जिल्हाधिकरी यांनी स्थानबध्दतेचे आदेश पारित केले त्यानंतर तो फरार असल्याने त्याचा शोध घेत असताना पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गणेश काटकर, यांना सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके हा वालचंदनगर येथील कामगार वसाहत पोस्ट कॉलनी येथील घरात बाहेरून कूलूप लावुन लपुन बसले असल्याची गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे पोलीस स्फाटसह या ठिकाणी जाऊन वालचंदनगर येथील कामगार वसाहतीत त्याचे जुने घरी पाठीमागुन प्रवेश करून त्यास ताब्यात घेवुन दोन पंचासमक्ष घराची झडती घेतली असता त्याच्याकडे अवैध शस्त्रसाठा मिळून आला आहे.

१) ०३ गावठी पिस्टल मॅगझीनसह

२) ०१ खाली मॅगझीन

३) १० जिवंत काडतुसे

४) ०९ गावठी सुतळी बॉम्ब

५) ०१ लोखंडी पालघन मुठ असलेली

६) ०१ मुठ नसलेले तलवारीचे धारदार पाते

७) ०२ लोखंडी धारदार चाकु

८) ०२ लोखंडी धारदार कटर

९) १४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल

मिळ्यालेल्या गावठी पिस्टल व गावठी सुतळी बॉम्ब बाबत सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके याचेकडे विचारपुस केले असता त्याने त्याचे व त्याचे साथीदाराचे असल्याचे सांगितले आहे. सुयश उर्फ तात्या घोडके याचेकडे अवैध शस्त्रसाठा मिळून आल्याने वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गुरन ३३१/२४ कलम २८८ बीएनएस सहकलम ३,४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम सहकलम ४ स्फोटक अधिनियम १९०४ सहकलम ३७ (१) (३) /१३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ही हत्यारे कोठुन आणि कोणाकडुन आणली आहेत याबाबत सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डुणगे हे करीत आहेत.

ही कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस. हवालदार शैलेश स्वामी, गणेश काटकर, प्रमोद बनसोडे, पोलीस शिपाई अभिजीत कळसकर, अमोल चितकोटे, राम आढाव, महिला . निता किर्दक प्रमोद टापसे, अमोल सोनवणे, महेश चोपणे यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *