राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन)  वाडा (ता. खेड ) येथे विदर्भातील महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी  ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
      डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा या महाविद्यालयाचा कृषीदूत रितेश आनंदा सुकाळे याने शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना बियाणे  वर्ग आणि व त्याचे महत्त्वाचे ठसे ( सीड क्लास अॅन्ड इम्पोर्टन्ट देअर टॅग्स) याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले.
     हा प्रयोग शेतीमध्ये केल्यास पेरणीपूर्व बियाण्यांची माहीती आणि उगवणक्षमता तसेच पिकांचा दर्जा याबाबत पूर्वकल्पना येते अशी माहीती त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
       या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आर. यु. वाघ, कार्यक्रम समन्वयक प्रा. श्रीमती व्ही. एस. गायकवाड व वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रा. ए. डी. सुराशे यांचे कृषीदुत व शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *