थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) अष्टविनायक सुविधा प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या थेऊर थेऊरफाटा मार्ग अरुंद झाल्याने वाहनचालकांना अडचण निर्माण होत आहे परिणामी अपघात होऊन गंभीर बाब निर्माण होते.या मार्गावर कुंजीरवस्ती येथे मोटार आणि डंपर याची समोरासमोर धडक झाली यात मोटार चालक ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार येथील कुंजीरवस्ती येथे थेऊर कडून पुणे सोलापूर महामार्गाकडे जाणाऱी मारुती कंपनीची बलेनो कार( एम एच 12-क्यू टी 6429) आणि थेऊरफाट्याकडून थेऊर कडे येणाऱा डंपर (एम एच 12टी व्ही 5570) यांचात समोरासमोर धडक होऊन मोठा आवाज झाला यात गाडी चालवत असलेले महाराष्ट्र शासन विक्रीकर निरीक्षक अधिकारी अभिजित सुरेश पवार (वय 32 राहणार श्रीगोंदा ) हे गंभीर जखमी झाले त्यांना स्थानिक नागरिक राहूल विष्णू सांळुखे व बाळासाहेब बबन शेडगे यांनी उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात पाठवून दिले मोटारी मध्ये एक दहा वर्षांचा मुलगा, दोन महिला आणि दोन पुरुष असल्याची माहिती मिळत आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्या अभिजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती पोलिस मदत कक्ष(112)ला माहिती कळवली असता थेऊर पोलिस चौकीचे बीट मार्शल किशोर कुलकर्णी व वसंत चव्हाण यांनी घटनास्थळी स्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून अपघातातील वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहे.
