पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) वाघोली गावचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर महापालिकेने सर्व व्यवहार ताब्यात घेतले आहेत परंतु आजपर्यंत येथे जन्म मृत्यू नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही त्यामुळे एखाद्या नागरिकाचे त्याच्या घरी नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृत्यू दाखला वेळेवर मिळत नाही परिणामी त्याच्या अंत्यसंस्कार करण्यास विलंब होतो.हा दाखला खाजगी डॉक्टर देत नाहीत अशा वेळी संबंधित अधिकारी तेथे उपलब्ध असणे आवश्यक आहे जर हा अधिकारी लवकरात लवकर नियुक्ती झाला नाही आणि दाखल्याविना अंत्यविधिस विलंब झाल्यास शिवसेना तो विधी कार्यालयाच्या परिसरात करेल असे पत्र सागर गोरे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहे.
पालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वाघोलीतील वाघेश्वर नगर मधील एका नागरिकाचा त्याच्या घरी सकाळी११ वाजता नैसर्गिक मृत्यू झाला त्यामुळे खाजगी डॉक्टर मृत्यू दाखला देईनात यावर पालिका कार्यालयात गेल्यावर तेथे संबंधित अधिकारी नियुक्ती नसल्याने तो दाखला मिळाला नाही परिणामी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास रात्रीचे ११ वाजले मृतदेहाची अशी हेळसांड एक अधिकारी नियुक्ती नसल्याने झाली आहे म्हणून पालिकेने याची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
