पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील कुख्यात गुन्हेगार रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण( वय 21 वर्ष राहणार जाधव वस्ती भावडी रोड वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे) यांचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरिता शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, वाघोली गायराण, भावडी तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच स्थानिक व सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु ठार मारण्याची धमकी देणे, नुकसान करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा झाल्या होत्या. त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्याने आरोपीच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4 ,पुणे शहर यांच्याकडे पाठविला होता. त्याचे अवलोकन करून पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तडीपार आदेश काढला असून गुंड रोहित चव्हाण याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलिस अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव यांनी केली.
