पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा )पुणे जिल्ह्यातील यवत, शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव, दौंड,खेड, जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी आठ जणांची टोळी तसेच माल घेणारा एक अशी नऊ जणांची टोळी जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून त्यांच्याकडून तब्बल ४८ गुन्हे उघडकीस आले आहेत यात ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करून एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा (१४,५०,०००/-)  मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने गुन्हे दाखल करणेत आले होते. विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते
विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरीचा तपास करण्यास अडचणी येत होत्या सीसीटीव्हीच कुठल्याही जाळ आजूबाजूला नसल्याने चोरी उकल होत नव्हती. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक  यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेवून योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करणेत आली होती.
तपास पथकांनी शिरूर पोलीसांचे मदतीने गुन्हयांचे घटनास्थळे पडताळून घटनास्थळाकडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करून तपास चालू केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोर्पीना ताब्यात घेण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करण्यात आली. विद्युत रोहीत्र चोरणारी करणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परीसरात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून आरोपी  विशाल खंडू पवार (वय २५ धंदा जेसीबी चालक राहणार  तांबेवाडी वडगाव सावताळ  ता. पारनेर जि. अहमदनगर), प्रदीप राजेंद्र शिंदे( वय २६ धंदा ड्रायव्हर रा. साकूर गाडेकर ता. संगमनेर अहमदनगर) , ओमकार अजित घोडेकर (वय १९ धंदा ड्रायव्हर रा साकुर घोडेकर मळा ता संगमनेर जि अहमदनगर),  आदेश सयाजी भुजबळ (वय १९ धंदा शेती रा साकूर हळदावस्ती ता संगमनेर जि अहमदनगर)  हर्षल राजेंद्र शिंदे (वय २४ धंदा शेती रा साकूर गाडेकरमळा ता संगमनेर जि अहमदनगर), श्रीकांत शिवाजी जाधव( वय २२ धंदा मासमारी विक्री रा सातकरवाडी दहीवडी ता शिरुर जि पुणे),  करण नाना माळी (वय १९ धंदा शेती रा दहिवडी मांजरेवस्ती ता शिरुर जि पुणे मूळ रा वांगदरी ता श्रीगोंदा जि अहमदनगर), सोनू विकास धुळे वय १८ धंदा मजूरी रा आंबळे ता शिरुर जि पुणे मूळ गाव वाडेबोल्हाई थेऊर ता हवेली जि पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्हयातील चोरी केलेला माल दिपक पांडुरंग सांगळे (वय २७ धंदा भंगारविक्री रा व्हाईटहाउस बोलेगाव फाटा नागापूर ता जि अहिल्यानगर) यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी पिकअप चारचाकी वाहनाचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने पिकअप चारचाकी वाहन, सहा मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या असून त्यापैकी एक मोटार सायकल चोरीची आहे. तसेच गुन्हयात चोरी केले मालापैकी ५०० किग्रॅ वजनाच्या तांब्याच्या पट्टया व तारा हस्तगत करणेत आलेल्या असून एकूण १४,५०,०००/- (१४ लाख ५० हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला असून ४८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत उघडकीस आलेले गुन्हे गुन्हयातील आरोपी  विशाल पवार याचे वर एकूण ११ मालमत्ता (मोटार सायकल) चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे याचेवर ०३ गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीचे गुन्हयात फरार आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक  संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक. ज्योतीराम गुंजवटे, स्था.गु.शा.चे सपोनि राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोसई अभिजीत सावंत, पोसई एकनाथ पाटील, अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ संजू जाधव, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, मपोना सुजाता कदम शिरूर पोलीस स्टेशनचे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर पो स्टे कडील अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *