tempo driver kicked a person to death

पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) घोडेगाव च्या हद्दीत भीमाशंकर रस्त्यावर डोंगरे हाँस्पिटलच्यामागे मोकळ्या जागेत तिन मटका बहाद्दरावर घोडेगाव पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून रु ५८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन महादू आसवले रा काटमदरा ता आंबेगाव व सोमनाथ तुकाराम बांबळे रा परांडा रोड घोडेगाव हे तुकाराम नामदेव काळे याच्या सांगण्यावरून लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका खेळवीत होते त्यावेळी घोडेगाव पोलिसांनी त्यांना त्याब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य मोबाईल फोन व एक दुचाकी वाहन असा एकूण रु ५८,१३० चा मुद्देमाल ताब्यात घेतला
       याची फिर्याद पोलीस नाईक दत्तात्रय किसन जढर यांनी दिली तर तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कालेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *