पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र जवान सोमनाथ मांढरे त्यांना लडाख येथे वीर मरण आले त्यांना येथील एका पोस्टवर पहाटेपासून नेमणूक होती हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध झाले त्यावर त्यांना लगेच जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.यासंदर्भातील माहिती सायंकाळी कुटूंबियांना कळविण्यात आली.
देश सेवा करीत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीर मरण आले . वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना याबाबत माहिती मिळाली. आसले येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधु महेश मांढरे यांना याची माहिती कळविण्यात आली. सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव उद्या पहाटे दिल्ली येथे पोहोचेल व संध्याकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल्यावर त्यांच्यावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
