लोणी-काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे शहराचे उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता गीताराम लांडगे यांची बिनविरोध निवड झाली, अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी अशोक शिंदे यांनी दिली.सरपंच निवडीची घोषणा होताच फटाक्याची आतषबाजी आणि हलगीच्या गर्जनेने संपूर्ण लोणीगाव दणाणून गेले.लोणीगावाातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ग्रामदैवत श्री अंबरनाथ मंदिरात दर्शन घेतले.

लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांनी पॅनेल प्रमुखांनी ठरविलेल्या कार्यकाळात राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली, सरपंच पदासाठी सविता लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या यावेळी हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर,विलास काळभोर,सुभाष काळभोर,शिवदास काळभोर,महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर,माजी उपसभापती सनी काळभोर,जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, आण्णासाहेब काळभोर,उपसरपंच प्रियांका सचिन काळभोर ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच राजाराम काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे,सुनिल बाबुराव गायकवाड, ग्रा.पं. सदस्या ज्योती अमित काळभोर, ललिता राजाराम काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके,संगीता सखाराम काळभोर,सविता जगताप, राहुल दत्तात्रय काळभोर, भारती राजाराम काळभोर, बकुळा पांडुरंग केसकर व ग्रामविकास अधिकारी,एस.एन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

           “लोणी-काळभोरचे भविष्यातील होत असलेले नागरिकीकरण,लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेऊन पुढील पंचवीस वर्षाचे नियोजन करण्यात येईल यासाठी मी पॅनेलमधील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आरोग्य सुविधा, रस्ते, विज याचा चांगला आराखडा बनवुन योग्य नियोजन करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सविता लांडगे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *