मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास

पुणे -(हवेली नामा वृत्तसेवा) भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्रही देण्यात आले. त्यांच्या या निवडीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही भाजप जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

निंबाळकर म्हणाले, भाजप ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लढवत आहे. यंदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान मोदींचा करिष्मा दिसेल. 2014 पेक्षा 2019 मध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. आता हीच परिस्थिती याही निवडणुकीत दिसेल. यंदाच्या निवडणुकीत 2019 पेक्षा अधिक जागा म्हणजे 403 चा आकडा आम्ही पार करू. पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *