पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भोसरी येथील एमआयडीसीतील एका कंपनीचा विद्युत लोड वाढवण्यासाठी पन्नास हजार रुपये(५००००) लाचेची मागणी भोसरी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता किरण गजेंद्र मोरे(वय ३३) यांनी मागितली व तडजोडीअंती पंचेचाळीस(४५०००) हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली भोसरी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका सत्तेचाळीस वर्षीय नागरिकाने केली होती
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फ्रेंड्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पुणे चे सर्व कामकाज पाहत होते या कंपनीला सनराईज कंपनीचा विघुत भार वाढवण्याचे काम मिळाले होते. सदर विद्युत भार वाढविण्यासाठी तक्रारदार यांने महावितरण कार्यालयात अर्ज केला होता अर्ज पुढील कार्यवाही साठी किरण मोरे यांच्याकडे होता.लोकसेवक किरण मोरे यांनी सदरचे काम करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलूचपत विभागाकडे केली होती या तक्रारीची पडताळणी पंच समक्ष केली असता लोकसेवक किरण माने यांनी तक्रारदार यांच्याकडे विद्युत भार वाढविण्यासाठी तडजोडी अंती पंचेचाळीस हजार रुपयांची लाच मागितली तक्रारदार यांनी पंचेचाळीस हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारी तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
