पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील मंडल अधिकारी (सर्कल) यांच्यासाठी नोंद मंजूर करण्यासाठी दोन खाजगी इसम यांना दहा हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती  सात हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत २५वर्षीय तक्रारदाराने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती.थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे,व दोन खाजगी संगणक चालक योगेश कांताराम तातळे(वय२२)( चौधरी पार्क दिघी पुणे),विजय सुदामा नाईकनवरे वय ३८(नागपूर चाळ येरवडा पुणे).

याबाबत लाचलूचपत पथकाने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांच्या आईच्या आजीच्या वडिलांचे कोलवडी ता.हवेली गावात असलेल्या जमिनीची सातबारावरील नाव कमी केल्याचे दिसून आले होते त्या नावे पुन्हा सातबारा उतारावर घेण्यासाठी तक्रारदार यांच्या आजी व तिच्या बहिणींनी हवेली तहसीलदार यांच्या कडे अर्ज केला होता.तहसीलदार यांनी तक्रारदार यांच्या आजीच्या आईची वडीलांची नावे सातबारा उतारावर नोंद करण्यासाठी कोलवडीचे तलाठी व थेऊरच्या मंडल अधिकारी यांना आदेश दिला होता.तलाठी यांनी घातलेल्या सातबारा नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदार थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयात जाऊन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांची भेट घेतली असता कवडे यांनी विजय नाईकनवरे यांना भेटण्यास सांगितले नाईकनवरे यांनी नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी यांच्यासाठी १००००रुपये लाच मागितली.याची तक्रारदार यांने  लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.तक्रारीची  पंचसमक्ष पडताळणी करुन लाचलूचपत विभागाने थेऊर मंडल अधिकारी कार्यालयामध्ये खाजगी इसम योगेश तातळे, विजय नाईकनवरे, यांनी पंचासमक्ष नोंद मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती सात हजार रुपये रक्कमेची मागणी केली त्यास तातळे व नाईकनवरे यांनी दुजोरा दिला.व दोघांनी सात हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली.थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी खाजगी इसम नाईकनवरे व तातळे यांना लाच घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून योगेश तातळे व विशाल नाईकनवरे याना ताब्यात घेतले असून या तिघांविरुद्ध  लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपतचे प्रतिबंधक विभागानचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले  यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *