पुणे(हवेलीनामा वृत्तसमूह) प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनेक दिग्गजांनी आपले वर्चस्व आजमावण्याचा प्रयत्न केला परंतू शेतकरी सभासदांनी गेल्या बारा वर्षाचा हिशेब चुकता करत शेतकरी विकास आघाडीस निर्विवाद बहुमत देऊन यशवंत सहकारीची सत्ता सोपवली.
माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर रयत शेतकरी सहकार पॅनल आणि माजी सभापती प्रकाश जगताप,माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे,माजी संचालक बाळासाहेब चौधरी,बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.यात शेतकरी विकास आघाडीने 21 पैकी 18 जागांवर विजय मिळवत ही बाजी मारली तर रयत सहकार पॅनलला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. मतमोजणी रविवार दिनांक १० रोजी महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे पार पडली यावेळी दोन्ही पॅनलमध्ये काही ठिकाणी चुरस दिसली तर काही ठिकाणी एकतर्फी निवडणूक झाली असून यामध्ये प्रत्येक गटात 600 पेक्षा जास्त मते बाद झाली असून शेतकरी विकास आघाडी पॅनलने रयत सहकार पॅनलचा धुवा उडवले.
गट क्रमांक एक मध्ये शेतकरी विकास आघडीचे उमेदवार सुनील सुभाष कांचन,(५४२२) संतोष आबासाहेब कांचन(५६३९) सुशांत सुनिल दरेकर,(५०५१)हे विजयी झाले असून गट क्रमांक २मध्ये शेतकरी विकास आघाडीचे ताराचंद साहेबराव कोलते,(५१९०) विजय किसन चौधरी,(५३०५) शशिकांत मुरलीधर चौधरी(५२०१) हे विजयी झाले गट क्रमांक तीनमध्ये शेतकरी विकास आघाडीचे दोन तर रयत सहकाराचा एक उमेदवार निवडून आला मोरेश्वर पांडुरंग काळे,(५२५२) नवनाथ तुकाराम(५१६१) काकडे योगेश प्रल्हाद काळभोर(४९५६)हे निवडून आले गट क्रमांक ४मध्ये शेतकरी विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले राहुल सुभाष घुले(५४८२) अमोल प्रल्हाद हरपळे (५४०८) निवडून आले तर ब वर्ग सोसायटी गटात सागर अशोक काळभोर(२०२) हे विजयी झाले.गट गट क्रमांक पाच मध्ये किशोर उंद्रे,(५२१७) रामदास सिताराम गायकवाड(५२२३) हे निवडून आले.गट क्रमांक६ मध्ये शेतकरी विकास आघाडीचा एक तर रयत सहकारचा निवडून आला सुभाष चंद्रकांत जगताप (५४६६) शामराव सोपान कोतवाल (४८९८) महिला राखीव मध्ये रत्नाबाई माणिक काळभोर(५६४१) हेमा मिलिंद काळभोर(५४४५) या दोन्ही शेतकरी विकास आघाडीचे महिला विजयी झाल्या. तर मागास प्रवर्गांमधून शेतकरी विकास आघाडीचे मोहन खंडेराव म्हेत्रे विजयी झाले त्यांना(४५१८)मते पडली अनुसूचित जाती जमाती मधून शेतकरी विकास आघाडीचे दिलीप नाना शिंदे हे विजयी झाले (५६९५) मते पडली प्रत्येक गटात सहाशेच्या पुढे मते बाद झाली आहेत. यशवंत सहकारी साखर कारखान्याचा सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेतकरी विकास आघाडी पॅनल बहुमताने निवडून आल्यामुळे एकच जल्लोष केला ढोल ताशाचा गजर गुलालाची मुक्त उधळण परत फटाक्यांची आतषबाजी करून विजय उत्सव साजरा केला यावेळी रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली होती सर्व कार्यकर्ते गुलालाची मुक्त उधळण करत घोषणा बाजीने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पॅनल प्रमुख हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप यांच्या सहा नंबर गटांमध्ये मोठे मताधिक्य मिळाले तसेच यशवंतची निवडणूक लावण्यासाठी माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे यांनी प्रत्येक गटात सभासदांमध्ये जी जनजागृती केली व कोर्ट कचेरी करुन कारखाना वाचला त्यामुळे शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असल्याची चर्चा सभासदांमध्ये होती.