पुणे ( हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील शंभू महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी लोणी काळभोर थेऊर,कुंजीरवाडी आंळदी म्हातोबा,कोलवडी येथील पुरातन महादेव मंदीरात भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी हर हर महादेव चा जयघोष करत भाविकांनी घेतले दर्शन लोणी काळभोर येथील अंचलेश्वर मंदीर तसेच षाषणकर बागेतील पुरातन मंदिरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या होमहवन होऊन भजन शंभू महादेवचा जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले थेऊर (ता.हवेली) येथील पुरातन असलेल्या खडकेश्वर,सिध्देश्वर,बेलीचा मळा,तांबेवस्ती येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी सकाळ पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.यामध्ये महादेवास दुग्धाभिषेक करण्यात आला. थेऊर(ता.हवेली) येथील तारमळा शाळेतील विद्यार्थ्यांनी भगवान शंकर पार्वतीचे वेशभूषा परिधान करून गणपती मंदिर परिसरात प्रदक्षिणा मारली. पौराणिक काळापासून प्रसिध्दी लाभलेले तिर्थक्षेत्र आहे.हे चिंतामणी गणपतीसाठी संपुर्ण राज्यात प्रसिद्ध असले तरीही येथे गावात महादेवांची पुरातन मंदिरे आहेत. यामध्ये गावच्या मध्यवर्ती भागात गणपतीमंदीरापासुन जवळच पंचलिंग महादेव मंदीर आहे. मुळात हे शिव पंचायतन असून याठिकाणी मंदिरात पाच देवतांच्या मूर्ती आहेत. अशा प्रकारचे शिव पंचायतन अन्य कोठे असल्याचे पाहवयास मिळत नाही. यामंदीराचा थेऊरच्या पुरातन इतिहासात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शंभू भक्तांनी दुध दही याचा अभिषेक केला.तसेच बेल व फुलांनी महादेवाची पिंड सजवलेली होती.तसेच गावच्या उत्तरेला असलेले खडकेश्वर महादेव मंदीर आहे हे यशवंत सहकरी साखर कारखान्याच्या मागच्या बाजूस मुळा मुठा नदीच्या काठावर असून अतिशय रम्य ठिकाण आहे. थेऊर हे पूर्वी याच परिसरात वसलेले होते त्यास जुने गाव असे संबोधण्यात येत होते असे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. येथे अतिशय नयनरम्य अशी महादेवाची पिंड आहे.भाविकांनी येथेही दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच गावच्या पूर्वेला असलेल्या सिध्देश्वर महादेव दर्शनासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच काकडेमळा तांबेवस्ती येथे शूभ महादेव ट्रस्टच्या वतीने मंदीरात महादेवांच्या पिंडिला शंभू भक्तांनी दुध दहीचा अभिषेक करुन विविध आकर्षक फुलांची आरास केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *