पुणे- ( हवेलीनामा वृत्तसमूह) आर्थिक संकटाच्या खाईत कारखान्याला लोटून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पाडणाऱ्या, खरेदी विक्री संघाची जागा बिल्डरच्या घशात घालणाऱ्या,बिल्डर धार्जिण्या लोकांनी कारखान्याची २५० एकर जमीनीवर डोळा ठेवून कारखाना खाजगी करायला निघालेल्या अशा बिल्डर हित जोपसणार्या विरोधी पॅनेलला तुम्ही मतदान करणार का? असा सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड यांनी उपस्थित असलेल्या सभासदांलि केलाआहे. दुसरीकडे मतदारांनी आमचे पॅनल निवडून दिल्यास शेतकरी, कामगार यांची थकित देणी प्राधान्याने देऊन कारखाना सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देखील प्रताप गायकवाड यांनी दिले.थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ९ मार्च रोजी होत आहे. यानिमित्त अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलची सांगता सभा थेऊर फाटा येथे पार पडली. यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना प्रताप गायकवाड यांनी वरील आश्वासन दिले.यावेळी पॅनेल प्रमुख व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी, हिरामण काकडे, कात्रज दुध संघाचे जेष्ठ संचालक गोपाळ म्हस्के, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट, माजी आमदार संभाजी कुंजीर, “यशवंत”चे माजी संचालक पंढरीनाथ पठारे,माणिक गोते, पांडुरंग काळे, बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, प्रकाश हरपळे, लक्ष्मण केसकर,मिलिंद हरगुडे, पोपट गायकवाड, विकास तुपे, शंकर हरपळे, सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी,कदमवाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड,कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर, शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णा महाडिक, सचिन मचाले,सुखदेव कोतवाल, प्रशांत घुले, अशोक कसबे, सचिन सातव, सागर कांचन, मोरेश्वर काळे, तानाजी चौधरी.विकास चौधरी, सचिन तुपे, शामल पवार जवळकर, कृषीराज चौधरी, अमोल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. विरोधकांची नजर फक्त कारखान्याच्या मालकीच्या अडीचशे एकरवर असल्याचा, आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला.प्रताप गायकवाड पुढे म्हणाले, “यशवंत” कारखाना तेरा वर्षांपूर्वी नैसर्गिक कारणामुळे बंद पडला नव्हता, तर समोरच्या पॅनेलमधील चौकडीमुळे बंद पाडला होता. याची कारणे या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या घराघरांमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे या चौकडीच्या विरोधात सर्व सभासदांनी निर्धार करून आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून एकहाती सत्ता देऊन यशवंत सुरू करण्याचा संकल्प करावा, असंही गायकवाड म्हणाले.यावेळी पॅनेल प्रमुख या नात्याने बोलताना प्रकाश जगताप म्हणाले, कारखाना सुरू करण्यासंदर्भात आम्ही केंद्र शासन, राज्य शासन, कृषी उत्पन्न बाजार समितीसह तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वच संस्थाआणि राजकीय नेत्यांची मदत घेणार आहोत. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यामाध्यमातून आम्ही बाजार समितीची निवडणूक लढवली आहे. तसेच राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यासाठी शासकीय मदत मिळवणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी 1250 मेट्रीकटन गाळप क्षमतेचा नवीन अध्यायावत इथेनॉल निर्मिती प्रकल्प व सध्याचा डिशनरी प्रकल्प दुरुस्त करून तो चालवणार आहोत. सभासदांना चांगला बाजारभाव मिळावा यासाठी 1250 मेट्रीकटन गाळप क्षमतेचा नवीन अध्यायावत इथेनॉल निर्मिती प्रकल्प व व सध्याचा डिशनरी प्रकल्प दुरुस्त करून तो चालवणार आहोत. तसेच हे करत असताना भांडवल उभारणी केल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांचे थकलेले ऊस बिल व कामगारांची थकीत देणी सर्वप्रथम देण्यास आम्ही बांधील आहोत, विरोधी पॅनलला आम्ही केलेल्या आरोपांना उत्तरे देता आली नाही खरा भष्टाचार यांनी केला आणि सभासदांना यांच्या चुकीच्या कारभाराचा फटका बसला असंही प्रशांत काळभोर म्हणाले. यावेळी कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे यांनी सांगितले की कारखाना २०००सालीच कारखाना बंद पडणार होता परंतु सुदैवाने नंतरच्या निवडणूकीत मी आणि प्रताप अण्णा निवडून आलो आणि कारखाना वाचला तत्कालीन संचालक मंडळाच्या गटातटाच्या राजकारण तसेच अनागोंदी कारभारामुळे कारखाना बंद पडला हा कारखाना चालू करण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो याचिका दाखल केल्या आणि अहोरात्र कष्ट घेऊन सत्ये शेवटी आम्हाला यश आले आणि कारखान्याची जमीन वाचविण्यात यश आले त्यावेळी माझ्या सोबत आठ हात होते आज चाळीस हजार सभासदांचे हात सोबत आहे त्यामुळे कारखान्याची जमीन न विकता कारखाना चालू करु शकतो.अनेक वेळा बँकेला विचारले कारखान्यावर एकूण कर्ज किती परंतु आजतागायत कारखान्याच्या असलेल्या कर्जाची माहिती मिळाली नाही कारखान्याच्या २५०एकर जमीनीची फक्त अडीच कोटीच केली होती कारखान्यावर नेमकं किती कर्ज आहे तो आकडाच सांगितलं नाही.कारखाना आपण चालूच करू त्यासाठी सभासदांनी आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला मत देऊन विजयी करावे असे आवाहन केले.
