पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या कार्याची कीर्ती जागतिक पातळीवर पोहोचली असून कोरोना काळातील वृक्ष संवर्धन तसेच गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य स्वरूपात मदतीबद्दल वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे
 फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली पाच वर्ष निसर्ग कार्य चालू आहे. तसेच वृक्षारोपण सोबत वृक्षसंवर्धन वर जास्त भर देण्यात येत आहे. सध्या या फाऊंडेशनचे कार्य २९ जिल्हात चालू असून, ही हरित चळवळ संपूर्ण भारत वर्षात पोहचून हरित भारत करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे आहे.वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मधील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यात शिरूर हवेली आमदार अशोक पवार, हवेलीचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर, उद्योजक  अनिष काळभोर, साधना सहकारी बँक माजी उपाध्यक्ष बाळासाहेब कोळपे,पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर ,लोणी काळभोर सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच ज्योती काळभोर वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        ग्रीन फाऊंडेशन च्या माध्यमातून वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, शालेय साहित्य वाटप,अन्नधान्य स्वरूपात मदत, उन्हाळ्यात पक्ष्यांना धान्य पाणी उपक्रम, बेटी बचाओ बेटी पढावो अभियान,झाडे लावा झाडे जगवा जनजागृती , अशा बहुतांश उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच कार्याची दखल घेत लंडन येथील वर्ल्ड बुक रेकॉर्डचे बेल्हेल्म जेझलर- युरोप स्वित्झर्लंड प्रमुख तसेच  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी घेतली.
        हा गौरव केवळ माझा एकट्याचा नसून महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यातील प्रत्येक पदअधिकारी- सभासद तसेच लोणी काळभोर गावाचा आहे .हा सन्मान ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच लोणी काळभोर यांस समर्पित करीत आहे असे अमित जगताप यांनी सन्मानास उत्तर देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *