पुणे- (हवेलीनाला वृत्तसेवा) महावितरणचे कंत्राटी कामगार संपावर गेल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत पूर्व हवेलीतील लोणीकाळभोरच्या काही भागात बारा तासहुन अधिक काळ विघुत पुरवठा बंद आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत  ( दिं ४ जानेवारी २०२३) रोजी ऊर्जामंत्री यांच्या समवेत संपकरी संघटनांची चर्चा झाली. त्या चर्चेत कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे असे आश्वासन लेखी स्वरूपात जाहीर केले होते. त्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत
कंत्राटी कामगारने ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती व वितरणावर परिणाम होणार असल्याने शासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी केली आहे. कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही कंपन्यांची झालेली बैठक निष्फळ ठरल्याने पुन्हा संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या कंत्राटी वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे.
 तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नये, कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करावी आदी मागण्यांसाठी हा संप होणार आहे. राज्य सरकार व वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने लक्ष घालून कंत्राटी कामगारांच्या संघटनांबरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,
संघटनांच्या वतीने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पत्र लिहून तातडीने मार्ग काढण्याची मागणी केलेली आहे. यासाठी संघटनांनी ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची हाक दिली आहे. ४२ हजार कंत्राटी कामगारांपैकी ९५ टक्के कंत्राटी कामगार संपावर गेल्यास वीजनिर्मिती, पारेषण व वितरणावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
संपात सहभागी होण्याचे आवाहन फेडरेशनचे मोहन शर्मा, सी. एन. देशमुख, कृष्णा भोयर, वीज कामगार महासंघाचे विठ्ठल भालेराव, अरुण पिवळ, इंटकचे दत्तात्रय गुट्टे, रवींद्र बारई, आर. टी. देवकांत आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *