थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर संचालक मंडळ निवडणुक होत असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी संचालक पांडुरंग काळे यांनी गटनिहाय बैठका घेतल्या.प्रत्येक गटात स्थानिक पातळीवरील सर्व नेते मंडळी एक मुखाने निवडणुक प्रक्रिया बिनविरोध घ्यावी यासाठी एकमत दाखवत होते मग निवडणुक प्रक्रिया जाहीर होताच बिनविरोध हा शब्द गुलदस्त्यात गेला आणि आपणच नेतृत्व करणार अशी दिवा स्वप्न रंगू लागले.आपण देखील यात सर्व प्रक्रियेत सोबत होतो असे शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार मोरेश्वर काळे यांनी सांगितले.

           कारखाना अवसायनात काढल्यानंतर कारखान्याची स्थावर मालमत्तेवर टाच येणार याला प्रतिबंध घालण्यासाठी कोणी पुढाकार घेतला हे शेतकरी सभासदांना वेगळे सांगायला नको.कारखाना पुन्हा गतवैभवाने चालवला जावा यासाठी सभासदांची सर्वसाधारण सभा घेण्यात आली त्यात हा कारखाना शेतकरीच चालू करतील यासाठी सर्व सभासद नियुक्त संचालक मंडळ निवडले जावे यासाठी एक सुर झाला.

          निवडणुक प्रक्रियेस लागणारा खर्च कारखान्याकडे नसल्याने सभासदांनी अनामत रक्कम जमा करावी असे ठरले.माजी संचालक पांडुरंग काळे यांनीच पुढाकार घेऊन तीस लाखाचा धनादेश जमा केला.त्यानंतर गटनिहाय बैठक घेऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधून निवडणुक खर्च उभारला.

          निवडणुक कार्यक्रम लवकर जाहीर करावा यासाठी त्यांनीच पाठपुरावा केला.मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर हा कार्यक्रम जाहीर झाला आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यात स्पर्धा लागली.

          त्यानंतर देखील बिनविरोध निवड प्रक्रियेसाठी असफल प्रयत्न झाला.यात अनेक उलथापालथ झाली आणि निवडणुक लादली.

         सन 2012 नंतर कारखान्याच्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून उच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई लढत आपली बाजू भक्कम मांडत पांडुरंग काळे यांनी लढाया जिंकल्या शेतकऱ्यांसाठी गड लढवत राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *