हवेली तालुक्याचे वैभव असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची तब्बल पंधरा वर्षानंतर संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया चालू झाली प्रचाराचा धुराळा उडाला असून जवळपास पंधरा हजार सभासद या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. परंतू या निवडणूकीत गर्क झालेल्यांनी यशवंतची सध्यस्थितीस जबाबदार असणार्यांना काही जाब विचारणार आहेत का?
माजी खासदार स्व.आण्णासाहेब मगर यांनी मोठ स्वप्न डोळ्यासमोर ठेवून हवेलीत थेऊरच्या पवित्र भूमीत यशवंतची उभारणी केली.शेतकऱ्यांस आपला हक्काचा साखर कारखाना मिळाला.पण गेल्या बारा वर्षांपासून ही कारखान्याची धडधड बंद पडली.
आज प्रचाराच्या धुमधडाक्यात सभासदाच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात भ्रष्टाचाराचे अरोप झाले शासकीय चौकशा लागल्या परंतु यात पैसा बुडतोय तो सर्सासर्वसामान्य शेतकरी सभासदांचा.
परस्पर विरोधी पॅनल एकमेकांवर मनसोक्त अरोप करत आहेत. तर सभासदांच्या मनातील खदखदत तर मतदानातून बाहेर पडणार आहे.येणारे पाच दिवस प्रचार शिगेला पोहोचेल.मनधरण्या भेटीगाठी सर्व चालणार आहे.
सर्वसामान्य शेतकरी आस लावून आहे ती यशवंतचे धुराडे सुरु होण्याची!
