पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी लोणीकाळभोर येथील नितिन लक्ष्मण जगताप यांची निवड करण्यात आली तर हवेली तालुका उपाध्यक्षपदी उदय जंगम, प्रसिद्ध प्रमुखपदी अमोल सोनवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना पुणे जिल्हाध्यक्ष सागर तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले यावेळी पुणे जिल्हा समता सैनिक दलाचे सचिव किशोर कांबळे,हवेलचे उपाध्यक्ष नितीन लोंढे,संजय गायकवाड, संघटक लक्ष्मण जगताप, विजय गायकवाड, संदीप चव्हाण, बाळासाहेब पाटोळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करून गावोगावी पक्ष वाढीसाठी सभासद संख्या वाढवण्यासाठी नियोजन बैठक पार पडली .कार्यक्रम वेळी तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यावेळी बोलतांना जगताप म्हणाले की पूर्व हवेलीतील गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सागर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करुन गाव तिथे शाखा अभियान राबविण्यात येणार आहे मिळालेल्या पदाचा वापर समाजातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी करून जनतेच्या अडीअडचणी सोडविणार असल्याचे यावेळी बोलतांना जगताप यांनी सांगितले.
