पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर संचालक मंडळ निवडीसाठी पुढील महिन्यात निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे गेली तब्बल बारा वर्षांपासून बंद पडलेला या कारखाना पुन्हा पूर्ववत चालू व्हावा यासाठी गेल्या वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्नात असलेल्या आणि यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत कायम गुंतलेल्या माजी संचालक पांडुरंग काळे यांनी जिकरीचे प्रयत्न करुन संचालक मंडळ स्थापन करून हा कारखाना चालू व्हावा म्हणून मागील वर्षात अनेक बैठका घेतल्या परंतू निवडणुक प्रक्रिया जाहीर होताच सर्वांनाच यात आपणास देखील संचालक असावे अशी आशा निर्माण झाली आणि आपले अर्ज दाखल करण्याच्या लगबगीला लागले.परंतू केवळ संचालक मंडळ निवडणुक झाली तर कारखाना चालू झाला असे नाही तर यासाठी तितक्याच ताकदीने उभा राहून कारखाना चालू करणारा संचालक हवा.

कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच गटातील सभासदांशी भेटी घेऊन त्याना आपली तळमळ सांगून पांडुरंग काळे यांनी भविष्यातील आपली भूमिका स्पष्ट केली याला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला,निवडणुक प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी लागणारा खर्च देखील गोळा करण्यात आला.जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर आपल्या कारखान्याचा खर्च वाचणार आहे.कारखाना पूर्वपदावर आणायचा असेल तर अनेक खर्चाला आळा घालणे आवश्यक आहे याची जाणीव सर्व सभासदांना असावी.

सध्यातरी निवडणूकीची रणधुमाळी उडाली असून पूर्व हवेलीतील चौकातून याचीच चर्चा चालू आहे.यशवंतचा सभासद अनेक वर्षानंतर कारखान्याबद्दल चर्चा करतोय. हवेलीतील शेतकऱ्यांसाठी स्वतःचा कारखाना संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे देशोधडीला गेला आणि गेली बारा वर्षांपासून चालू होण्यासंदर्भात अनेक राजकीय इच्छाशक्तीकडून फायदा घेतला पण आजपर्यंत काहीच घडले नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *