पुणे : (हवेलीनामा वृत्तसमूह) पुण्यातील कोथरूड भागातील गुंड शरद मोहोळवर5 जानेवारीला मुन्ना पोळेकर व त्यांच्या साथीदारांनी गोळीबार केला होता यात शरद मोहोळ जागीच मृत्यूमूखी पडला होता त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यात पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली पुणे पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास केला यात यात मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार असल्याचे निष्पन्न झाले  यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का  लावण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत जवळपास 24 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *