पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) अयोध्येत झालेल्या प्रभू राम मंदिर लोकार्पण सोहळा व श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयात धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी(दि.२२) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावातील मुख्य चौकातील दत्त मंदिर ते तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय दरम्यान प्रभु श्री रामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.लोणी काळभोर गावातील महिला भगिनींनी संपूर्ण गावठाणातील रस्त्यांवर आकर्षक रांगोळी काढली होती. परिसरातील नागरिकांनी डोक्यावर भगवी टोपी आणि झेंडे घेऊन सर्व वातावरण भगवंमय केले होते.गावठाणात रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र भगवे झेंडे लावले होते जागोजागी रामाची गाणी वाजत होती.पारंपरिक ढोलताशाच्या लेझिमच्या गजरात मिरवणूक रामदरा शिवालयाच्या दिशेने गेली.यावेळी मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने लहाना थोरांसह जेष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते जय श्री रामाच्या जय घोषाने अवघी लोणीकाळभोर परिसर दुमदुमून निघाला होता तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात दुपारी १२ वाजता मिरवणूक रामदरा येथे पोहचल्यानंतर रामदरा शिवालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले व नंतर महाआरती झाली.त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमांच्या निम्मिताने सायंकाळी ६ ते ८ दरम्यान गावातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. लोणी काळभोर (ता. हवेली) येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त रामायण, भजन, हरिपाठ, हनुमान चालीसा पठण, संगीतमय सुंदरकांड, रांगोळी, मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद व दीपोत्सव आदी कार्यक्रम करण्यात आले.थेऊर येथील चिंतामणी मंदीरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्ट व थेऊर ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते भाविकांना आयोध्यातील लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यासाठी एलएडी स्क्रीन ची सोय करण्यात आली होती रामलल्लावर अक्षता व पुष्पवृष्टी करण्यात आली दुपारी मंदीरात महाआरती घेऊन भाविकांनी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. चिंतामणीचे पुजारी आगलावे बंधू यांनी तयार केलेली प्रभू श्रीरामाची मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली सर्वत्र रांगोळी भगवे झेंडे भजन कीर्तन हरीनामाचा गाजर विजेचा दणदणाट  पारंपरिक बँड तसेच गावातील बालचूमीनी राम लक्ष्मण सितामाई पवनपुत्र हनुमान यांची वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता हात भगवा झेंडा डोक्यावर श्री राम लिहलेली टोपी गाळ्यात भगवी शाल घालून रामभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी प्रभू रामाच्या नामाचा जयघोष करत मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली महा आरती घेऊन सोहळ्याची सांगता झाली

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *