पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) आज कुंजीरवाडी येथे आयोध्या मध्ये होत असलेल्या राम मंदिर लोकार्पण आणि प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त कुंजीरवाडी येथील पांडुरंग कृपा जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने श्रीरामांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन शिवसेना ठाकरे गटाचे स्वप्निल कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आले आयोध्यात होणारे मंदिर प्रभू राम प्राणप्रतिष्ठा निमित्त कुंजीरवाडीत उत्सव साजरा करण्यात आला राम नामा चा जयघोष यावेळी करण्यात आला.जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष लक्ष्मण कुंजीर यांनी सांगितले की प्रभु रामचंद्र चरा चरात स्थायी आहेत त्यांच्या नामस्मरणाने अनेक संकटे दूर पळून जातात आज त्यांचे भव्य मंदिर आयोध्या येथे साकारतेय ही अभिमानाची बाब आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते स्वप्निल कुंजीर पाटील यांनी सांगितले की श्रीराम हे अखंड हिन्दुस्थान चे आराध्य दैवत आहे ज्यांनी मंदिर निर्माणासाठी कारसेवा केली प्रसंगी अनेकांनी बलिदान दिले अशा सर्व रामभक्तांचे नमण आज करणे गरजेचे असल्याचे स्वप्निल कुंजीर पाटील म्हणाले यावेळी जेष्ठ नागरिक संघ तालुका अध्यक्ष सुरेश कुंजीर लक्ष्मण कुंजीर सचिव बबन कुंजीर खजिनदार माऊली हेंद्रे दत्तात्रय कुंजीर जनजागृती तरुण मंडळ अध्यक्ष नंदकुमार कुंजीर चेअरमन बबन ढूमे रा कॉंग्रेस कुंजीरवाडी अध्यक्ष नानासाहेब कुंजीर सुदाम तापकीर सह मान्यवर उपस्थित होते.
